T20 World Cup 2024 (IND vs PAK Match & Drop-in Pitch) : टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना यूएसए मध्ये खेळवण्यात आला तेव्हापासून तेव्हापासून ड्राप इन पिच (खेळपट्टी) बाबतचा मुद्दा जोर धरू लागला आहे. खासकरून न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियम सध्या चर्चेचा विषय बनत आहे, ज्यावर फलंदाजी करणं इतकी अवघड आहे की एका डावात 100 धावा करणे देखील खूप कठीण ठरत आहे.
या मैदानावर 9 जून रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार असून त्याआधी या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला अवघ्या 77 धावांत गुंडाळले होते. टी-20 विश्वचषकात कोणताही संघ या मैदानावर 100 धावांचा टप्पा गाठू शकलेला नाही आणि त्यामुळेच ड्राप इन पिच (खेळपट्टी)वरून गदारोळ होत आहे. चला तर मग जाणून घेऊया की, ड्राप इन पिच काय आहे आणि त्याबद्दल इतका गोंधळ का होत आहे.
ड्रॉप इन पिच म्हणजे नेमंक काय…?
‘ड्रॉप इन’ हे नावच सूचित करते की एका ठिकाणी (drop in pitch) खेळपट्टी तयार केली गेली आहे आणि ती उचलून दुसऱ्या ठिकाणी नेली जाऊ शकते. या प्रकारची खेळपट्टी स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी हलवली जाऊ शकते.
खासकरून जर आपण न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियमबद्दल बोललो तर या मैदानाची खेळपट्टी ऑस्ट्रेलियातील ॲडलेडमध्ये तयार करण्यात आली होती. नंतर ती न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियम आणली गेली. या खेळपट्ट्या बनवण्यासाठी कोणत्याही कृत्रिम साहित्याचा वापर केला जात नाही, तर त्या पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांनी बनवलेल्या असतात.
T20 World Cup 2024 : युगांडाच्या गोलंदाजाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या वर्षी केला विश्वविक्रम…
का होत आहे वाद?
आतापर्यंत अमेरिकेत खेळले जाणारे टी-20 विश्वचषक 2024 चे सामने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. फ्लोरिडातील सेंट्रल ब्रॉवर्ड मैदानावर एकही सामना झाला नसला तरी टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमबाबतही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पण न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमने चाहत्यांचीच नव्हे तर तज्ज्ञांचीही निराशा केली आहे. नासाऊ स्टेडियममध्ये चेंडू खूप फिरत आहे, त्यामुळे आजपर्यंत या मैदानावर प्रथम खेळणाऱ्या संघाने 100 धावांचा टप्पाही गाठलेला नाही. चौकार आणि षटकारांनी भरलेला डाव ही टी-20 क्रिकेटची व्याख्या आहे, परंतु जेव्हा संघ 100 धावा करण्यासाठी देखील संघर्ष करत होते तेव्हा टीका अपरिहार्य होते.
T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर विश्वचषकातही ग्लेन मॅक्सवेल फ्लॉप, लाजिरवाण्या विक्रमाची केली नोदं…
खेळपट्टी नंतर चांगली होईल का?
अलीकडेच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पॉल टेलरने एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, ही एक (Drop in Pitch) नवीन खेळपट्टी आहे, जी स्थिर होण्यास थोडा वेळ लागू शकतो. पॉलच्या मते, स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होऊ शकते. आतापर्यंत चेंडू कधी खूप उसळी घेत होता तर कधी चेंडू खूपच खाली राहतो. यावर पॉल म्हणाले की, अर्धी स्पर्धा संपेपर्यंत परिस्थिती सुधारेल.