T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2, Toss Update) :- टी-20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाला ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून आणि सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा इंग्लंड संघांच्या बाजूनं लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागेल.
A cracking semi-final clash awaits 💥
England have won the toss and elected to field first in Guyana.#T20WorldCup | #INDvENG | 📝: https://t.co/D5R0QuCHX7 pic.twitter.com/Ll9lhw4fk5
— ICC (@ICC) June 27, 2024
त्याचवेळी समालोचक रवी शास्त्री यांनी भारतीय कर्णधार रोहितला विचारले की, नाणेफेक जिंकल्यानंतर तू काय निर्णय घेतला असता? यावर रोहित म्हणाला की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता.
दरम्यान, नियमित वेळेनुसार टाॅस हा 7.30 वाजता तर सामन्यास सुरूवात 8.00 वाजता होणार होती. पण गयानामध्ये झालेल्या पावसामुळे आणि ओल्या मैदानामुळे टाॅसला विलंब झाला. पाऊस थांबल्यानंतर आणि मैदान कोरडे केल्यानंतर भारतीय वेळेनुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचा टाॅस 8:50 वाजता झाला असून हा सामना 9:15 वाजता सुरू होईल. हा सामना पूर्ण 20-20 षटकांचा असेल.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत गयाना येथील प्रोव्हिडन्स मैदानावर 5 सामने खेळले गेले. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या 146 होती. त्याच वेळी, प्रति षटक सरासरी धावा 6.20 होत्या आणि या 5 सामन्यांपैकी, ज्या संघाने तीन वेळा लक्ष्याचा बचाव करणारा आणि दोनदा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे.