T20 World Cup 2024 (Arshdeep Singh) :- अर्शदीप सिंगने 2024 च्या टी-20 विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी केली. संपूर्ण स्पर्धेत त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. कोणत्याही विरोधी संघाचे फलंदाज त्याच्यापुढे टिकू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने किलर गोलंदाजीचे उदाहरण सादर केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तो संघासाठी सर्वात मोठा स्टार गोलंदाज उदयास आला आहे. अर्शदीपची लाईन लेन्थ अतिशय अचूक होती आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या यॉर्कर बॉल्सला विरोधी संघांकडे उत्तर नव्हते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्शदीप सिंगने चांगली गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 20 धावा देत 2 बळी घेतले. या सामन्यात त्याने क्विंटन डी कॉक आणि एडन मॅक्रॅमचे विकेट्स मिळवले. 2024 च्या टी-20 विश्वचषकातील 8 सामन्यात त्याने एकूण 17 विकेट घेतल्या. तो टी-20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत संयुक्तपणे-सर्वाधिक बळी घेणारा अव्वल गोलंदाज बनला आहे. अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीने याच विश्वचषकात एकूण 17 विकेट घेतल्या आहेत.
तसेच अर्शदीप सिंग हा टी-20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 17 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या आधी, कोणत्याही भारतीय गोलंदाजाला टी-20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 17 बळी घेता आले नव्हते. जसप्रीत बुमराहने टी-20 विश्वचषक 2024 मध्ये 15 विकेट घेतल्या आहेत.
टी-20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज:
1.फझलहक फारुकी- 17 विकेट, 2024
2. अर्शदीप सिंग- 17 विकेट, 2024
3. वानिंदू हसरंगा- 16 विकेट्स, 2021
4. अजंथा मेंडिस- 15 विकेट, 2012
5. एनरिक नॉर्खिया- 15 विकेट, 2024
6. जसप्रीत बुमराह- 15 विकेट, 2024
7. वानिंदू हसरंगा- 16 विकेट, 2022
अर्शदीप सिंगने 2022 साली टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघासाठी पदार्पण केले. यानंतर तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीतील महत्त्वाचा दुवा बनला आहे. त्याने भारतीय संघासाठी 52 टी-20 सामन्यात आतापर्यंत 79 विकेट घेतल्या आहेत.