T20 World Cup Prize Money & BCCI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. त्याचवेळी, या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.
टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआय (BCCI) 125 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह काय म्हणाले?
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की,”मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, भारतीय संघाने आयसीसी पुरुषांचा टी-20 विश्वचषक जिंकला आहे त्याबदल त्यांना 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात उत्तम खेळ, प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली.”
I am pleased to announce prize money of INR 125 Crores for Team India for winning the ICC Men’s T20 World Cup 2024. The team has showcased exceptional talent, determination, and sportsmanship throughout the tournament. Congratulations to all the players, coaches, and support… pic.twitter.com/KINRLSexsD
— Jay Shah (@JayShah) June 30, 2024
टीम इंडिया दुसऱ्यांदा बनली टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन …
भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. याआधी 2007 मध्ये भारताने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून पहिला टी- 20 विश्वचषक जिंकला होता.
टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 169 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.