USA vs Canada Match Highlights:- आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला रविवारी सुरूवात झाली आहे. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अमेरिकेने 7 गडी राखून कॅनडावर मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात अमेरिकेने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठे धावांचे आव्हान अवघ्या 17.4 षटकात पूर्ण केले. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अमेरिकेचा हा पहिला विजय आहे. या सामन्यात वादळी फलंदाजीचे प्रदर्शन करणारा अरॉन जोन्स अमेरिकेच्या विजयाचा हिरो ठरला.
कॅनडातील डॅलस येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे त्यांच्या बाजूने गेला. कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावा केल्या. नवनीत धालीवालने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 44 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अमेरिकेने 17.4 षटकांत 3 बाद 197 धावा करत विजय नोंदवला.
A marathon 131-run stand between Aaron Jones and Andries Gous power USA to an opening day victory over Canada 👊#T20WorldCup | 📝 #USAvCAN: https://t.co/xvy3gvUUKt pic.twitter.com/XcH1qTRMTa
— ICC (@ICC) June 2, 2024
अमेरिकेच्या फलंदाजांसमोर कॅनडाचे गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. अरॉन जोन्सने अमेरिकेसाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. याशिवाय अँड्रिज गसने 46 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावा केल्या.
195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टीव्हन टेलरच्या रूपाने संघाने पहिला गडी गमावला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार मोनांक पटेल आणि अँड्रिज गस यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी १८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्णधार पटेल बाद झाल्याने तुटली. मोनांकने १६ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १६ धावांची खेळी साकारली.
यानंतर अँड्रिज गूस आणि अरॉन जोन्स (Aaron Jones) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३१ धावांची जलद भागीदारी केली. या भागीदारीमुळे सामना अमेरिकेच्या बाजूने झुकला. या भागीदारीनंतर हा सामना अमेरिकेसाठी एकतर्फी ठरली. ही शानदार भागीदारी १६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अँड्रिज गसच्या विकेटने संपुष्टात आली. अँड्रिजने ४६ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली. यानंतर कोरी अँडरसन आणि जोन्स यांनी चौथ्या गड्यासाठी २४ धावांची नाबाद भागीदारी करून अमेरिकेला विजय मिळवून दिला. जोन्सने नाबाद ९४ धावा केल्या, तर अँडरसन ५ चेंडूत धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
जोन्सचे वादळ
जोन्सने या सामन्यात कॅनडाच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. त्याने अवघ्या 40 चेंडूंचा सामना करताना केवळ 4 चौकार फटकावले मात्र, तब्बल 10 षटकारांची आतषबाजी करत कॅनडाच्या गोलंदाजीची लयच बिघडून टाकली.
कॅनडाची दीशाहीन गोलंदाजी
अमेरिकेचे फलंदाज आक्रिमक खेळत असताना कॅनडाकडे त्यांना रोखण्याची कोणतीही योजना दिसली नाही. त्यांनी दीशाहीन गोलंदाजी करत अमेरिकेचा विजय सोपा केला. कॅनडाकडून कलीम सना, डिलन हेलिगर आणि निखिल दत्ता यांनी प्रत्येकी 1 बळी घेतली. निखिल दत्ता संघासाठी सर्वात महागडा ठरला, त्याने 2.4 षटकात 15.40 च्या सरासरीने 41 धावा दिल्या. याशिवाय परगट सिंगने एका षटकात 15 धावा दिल्या. जेरेमी गॉर्डनने 14.70 च्या सरासरीने 3 षटकात 44 धावा दिल्या आणि कर्णधार साद बिन जफरने 4 षटकात 10.50 च्या सरासरीने 42 धावा दिल्या.
संक्षिप्त धावफलक – कॅनडा २० षटकात ५ बाद १९४ धावा. (नवनित दहीवाल ६१, निकोसल किर्टन ५१,श्रेयस मोवा नाबाद ४३, हरमीन सिंग १-२७). अमेरिका १७.३ षटकांत ३ बाद १९७ धावा. (अंड्रीज गौस ६५, अरॉन जोन्स नाबाद ९४, डीगन हायलिगर १-१९).