Shalin Bhanot | अभिनेता शालिन भनोत सध्या ‘खतरों के खिलाडी 14’ या रिॲलिटी शोचे शूटिंग करत आहे. मात्र स्टंटदरम्यान त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली. शालिनवर 200 विंचूने हल्ला केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याचा चेहरा सुजलेला दिसत आहे. तसेच त्याच्या शरीरावर जखमा देखील झाल्याचे दिसत आहे.
शालिन भानोत व्हिडीओमध्ये ‘मला विंचू चावले’ असल्याचे सांगतो. यावेळी त्याच्यावर सेटवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र त्याच्या या व्हिडीओवरून त्याला ट्रोल केले जात आहे. ‘हे सगळं करण्यासाठी तुला पैसे मिळतात,’ असे काही नेटकऱ्यांंनी त्याला म्हंटले आहे. तर काहींनी त्याच्याबाबत चिंता देखील व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
शालीन भानोत याआधी बिग बॉस 16 या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. शो दरम्यानच रोहित शेट्टीने त्याला खतरों के खिलाडी 14 ऑफर केली होती. शालीन भानोतने सुरुवातीला शोची ऑफर तिच्या क्षमतेत नसल्याचे सांगून नाकारली होती. त्यानंतर शालीन एका टीव्ही शोसाठी काम करणार होता, पण जेव्हा शो पुढे ढकलण्यात आला तेव्हा त्याने ‘खतरों के खिलाडी 14’ ची ऑफर स्वीकारली. Shalin Bhanot |
बिग बॉस सोडल्यानंतर शालिन भानोत एकता कपूरच्या टीव्ही शोध्येही दिसली होता. तसेच त्याने ‘नच बलिए 4’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. ‘गृहस्थी’, ‘सात फेरे: सलोनी का सफर’, ‘कुलवधू’,’सूर्यपुत्र कर्ण’ आणि ‘सान्या’ सारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.Shalin Bhanot |
हेही वाचा:
काँग्रेसचा दणका! माजी आमदाराचे ६ वर्षांसाठी निलंबन; ‘या’ कारणामुळे केली नाना पटोलेंनी कारवाई