घाटकोपर : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आज पोलीस विभागाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुमारे घटनेच्या 40 दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगला परवानगी देणाऱ्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. गृहविभागाच्या आदेशानंतर पोलीस विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
घाटकोपर होर्डींग दुर्घटना प्रकरणात वरिष्ठ IPS अधिकारी कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. घाटकोपर हॉर्डिंगला पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर परवानगी दिल्याचा आरोप कैसर खालिद यांच्यावर आहे. पोलीस महांसचालक कार्यालयाने गृहविभागाला सविस्तर अहवाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
कैसर खालिद हे तत्कालिन लोहमार्ग महानिरीक्षक होते. तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या PCR विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आलं आहे.