सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सूरज निकम हा ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ होता. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळे सांगलीतील कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पैलवान सूरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी या गावचा रहिवासी आहे. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. सांगली पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.