लंडन : ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकांबद्दल सट्टेबाजी केल्याबद्दल पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षातील एका सुरक्षा अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ब्रिटनमधीलसार्वत्रिक निवडणुका अपेक्षेपेक्षा खूप लवकर जाहीर करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्याच्या अटकतकेबद्दल पोलिसांनी गुरुवारी माहीती दिली. सोमवारी अटक झालेल्या या अधिकाऱ्याला नियमित कामातून बेदखल करण्यात आले आहे. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली असून सविस्तर चौकशी अजून बाकी आहे, असे पोलिसांनी सांगितले.
एक कंझर्व्हेटिव्ह खासदार आणि सुनक यांचे संसदीय सहाय्यक क्रेग विल्यम्स यांनी निवडणुकीच्या तारखेवर पैज लावल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. त्यामुळे कंझर्वेटिव्ह पक्षावर सट्टेबाजीचा आरोप व्हायला लागला आहे. आता गॅम्बलिंग आयोगाकडून होत असलेल्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी विल्यम्स यांनी दाखवली आहे.
ब्रिटिश निवडणूक नियमांनुसार पंतप्रधान सुनक यांना निवडणुकीची तारीख निवडण्याचा अधिकार होता. वर्षाच्या उत्तरार्धात निवडणूक होईल असे पूर्वीचे संकेत असताना सुनक यांनी ४ जुलैची निवड केली आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेक राजकीय विश्लेषकांना धक्का बसला आहे. निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत घेतल्या जाऊ शकल्या तरी चालू शकले असते.