बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या गावामध्ये दगडफेकीची घटना समोर आली आहे. दगडफेकीनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. ही दगडफेक नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दगडफेकीची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
बीडच्या मातोरी तालुका शिरूर कासार येथील बस स्टॅण्डवर ही दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीमध्ये दुचाकी तसंच डीजेचे नुकसान झालं असून काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर चकलंबा पोलील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेकीच्या घटनेमुळे बीडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
डीजे वाजण्याच्या कारणावरून या गावात दोन गट आमने सामने आल्याने ही दगडफेक झाल्याचे समजत आहे. यात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक महिती आहे. यात काही दुचाकी फुटल्या आहेत. तर डीजेचे देखील मोठं नुकसान झालेले आहे. सध्या मातोरी गावात तणाव पुर्ण शांतता आहे.