मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली.
शिवाय अलीकडेच सोनुने गरीब विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन देखील दिले आहे. लॉकडाऊनमुळे अद्यापही शाळा बंद आहेत,ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, परिस्थिती अभावी काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यानं त्यांचं शिक्षण थांबत असल्याचं दिसून येत आहे. अश्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने आणि करण गिल्होत्रा यांनी स्मार्टफोन दिले आहे.
हरयाणातील मोरनी येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थ्यीनींचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सोनू सूदने आणि करण गिल्होत्रा यांनी व्हिडिओतील विद्यार्थ्यीनींच्या शिक्षकांना संपर्क केला. शाळेत असे किती विद्यार्थी आहेत, की त्यांच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी मोबाईल नाही. यांची माहिती त्यांनी घेतली. आणि त्यानंतर 13 ते 14 विद्यार्थ्यांची नावं काढून त्यांना स्मार्टफोन दिले.