Sonakshi-Zaheer Wedding | Shatrughan Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. मागील अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाची बरीच चर्चा होती.
तसेच घरच्यांना देखील हे लग्न मान्य नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण अखेर कुटुंबाच्या आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि झहीरने लग्न केलं.
मुंबईतील वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली. तसेच आता त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला अनेकांना आमंत्रित केले असून मुंबईतील दादर परिसरातील बॅस्टियन रेस्टॉरंट येथे हे रिसेप्शन पार पडले.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर काल (23 जून 2024) लग्नबंधनात अडकले. झहीरसोबतच्या आंतरधर्मीय विवाहामुळे सोनाक्षीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे.
सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असताना. अभिनेत्रीचे वडील आणि दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलीच्या लग्नाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. लेकीच्या लग्नानंतर काय भावना आहे? असा प्रश्न शत्रुघ्न यांना विचारण्यात आला होता.
View this post on Instagram
त्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “ही काय विचारण्याची गोष्ट आहे का? प्रत्येक बापाला या क्षणांची प्रतीक्षा असते. जेव्हा लेकीने निवडलेल्या मुलाला तिला सोपवायचं असतं. दोघांचं नातं सुरक्षित राहू दे..
सांगायचं झालं तर, 44 वर्षांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिभाशाली मुलगी पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्न केलं. आता सोनाक्षी हिने देखील तिच्या आवडीने लग्न केलं आहे’. असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
कशी सुरु झाली सोनाक्षी आणि झहीरची लव्हस्टोरी?
सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली.
पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने ‘डबल XL’चित्रपटात एकत्र काम केले आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं आणि आज ते लग्नबंधनात अडकले.