तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक संस्थाकडून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
या वेळी स्वातंत्रवीर सावरकर प्रतिष्ठान गुरुकुल येथे धान्यवाटप करण्यात आले. सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थिनींना वह्या वाटप करण्यात आल्या. हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था, देवराई संस्था, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने तळ्याकाठी वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच माजी मंत्री बाळा भेगडे, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पवार, मावळ तालुका भाजपाचे प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, निर्मल वारीचे प्रवर्तक संतोष दाभाडे पाटील,
नगरसेवक अरुण भेगडे पाटील, शोभा भेगडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, तळेगाव शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा शोभा परदेशी, तळेगाव दाभाडे शहर आरपीआयचे माजी अध्यक्ष तांनाजी गडकर, विविध संस्थाचे पदाधिकारी, सन १९७४- ७५ आकारावीचे त्यांचे वर्गमित्र आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.