Singer Monali Thakur | गायिका आणि अभिनेत्री मोनाली ठाकूर भर कॉन्सर्टमध्ये संतापल्याचे पाहायला मिळाले. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तिच्यासोबत गैरवर्तवणूक करण्यात आल्याने मोनाली भडकली आणि तिने कॉन्सर्ट थांबवले. कॉन्सर्ट सुरू असताना एका प्रेक्षकाने मोनालीच्या प्रायव्हेट पार्टबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
एका वृत्तानुसार, भोपाळमधील सेज युनिव्हर्सिटीमध्ये मोनाली ठाकूरच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टसाठी कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. परफॉर्मन्स सुरू असताना मोनालीने अचानक कॉन्सर्ट थांबवला. त्यानंतर मोनाली ठाकूरने गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवत तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केल्याचे सांगितले. तिने अशा प्रकारची कृती ही लैंगिक छळ असल्याचे म्हटले.
काही लोक गर्दीत लपून कमेंट करतात याविरोधात मी आवाज उचलत आहे. जेणेकरुन त्या व्यक्तीलाही ते लक्षात राहील. आज झालेल्या घटनेवर माझा तीव्र आक्षेप असल्याचेही मोनालीने म्हटले आहे. तर त्या व्यक्तीने नंतर स्पष्टीकरण देत केवळ मोनालीच्या डान्स मूव्ह्जवर कमेंट केली होती. काहीही आक्षेपार्ह बोलला नसल्याचे सांगितले. Singer Monali Thakur |
दरम्यान, मोनाली ठाकूरला ‘ये मोह मोह के धागे’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर ‘सवार लूँ’ गाण्यासाठी तिने फिल्मफेअर पटकावला. तिने अनेक सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये जजची भूमिका देखील पार पाडली आहे. Singer Monali Thakur |
हेही वाचा:
समृद्धीवरील लक्झरी बस अपघातातील मृतांचे कुटुंब मदतीच्या प्रतिक्षेत; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल