Siddharth-Mithali Photos| अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठमोळी जोडी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आपल्या कामाच्या अपडेटबाबत किंवा वैयक्तिक गोष्टीबाबत दोघेही चाहत्यांसोबत माहिती शेअर करतात. अनेकदा ही जोडी परदेशवारी करताना दिसून आली आहे. आता पुन्हा एकदा सिद्धार्थ आणि मिताली इटलीमध्ये एन्जॉय करत आहेत.
सिद्धार्थ आणि मिताली दर सहा महिन्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्याचा आनंद घेतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची युरोप टूर केली होती. पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर दोघांनी फोटोशूट केलं होतं. त्यांचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडले होते. आता त्यांनी इटली टुरचे देखील फोटो शेअर केले आहेत. यातील सिद्धार्थचा हँडसम तर मितालीचा बोल्ड लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. इटलीतील त्यांचे फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
View this post on Instagram
निळ्या रंगाचा टू पीस आणि व्हाईट जॅकेट, नाजूक नेकलेस, ड्रेसला मॅचिंग क्लीप अशा लूकमध्ये मिताली खूपच हॉट दिसत आहे. सध्या तिच्या या फोटोवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. तर सिद्धार्थने लेमन -पिंक रंगाचा शर्ट आणि शॉर्ट्स असा फॅशनेबल लूक केला आहे. दोघांच्या या हटके लुकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
दरम्यान, अनेकदा मितालीला सोशल मीडियावर हॉट फोटोंमुळे ट्रोलही केले जाते. मात्र ट्रोल करणाऱ्यांना मिताली देखील सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान, सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या ‘झिम्मा 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळला. त्यानंतर सिद्धार्थ ‘ओले आले’ हा चित्रपटही दिसला. यात नाना पाटेकर, सायली संजीव यांचीही प्रमुख भूमिका होती.
हेही वाचा: