बिहारमधील भाजप आमदार श्रेयसी सिंह यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये शॉटगन ट्रॅप स्पर्धेत श्रेयसी सिंह यांची निवड झाली आहे. 17 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर श्रेयासी हिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. अर्जुन पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे. ऑलम्पिकमध्ये खेळणारी श्रेयसी पहिली बिहारी आहे.
कोण आहे श्रेयसी सिंह ?
बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघातून श्रेयसी आमदार आहे. 29 ऑगस्ट 1991 मध्ये नवी दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. शूटर श्रेयसी या बिहारमधील राजघराण्यातील सदस्य आहेत. श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत.राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांची आई पुतुल सिंग याही खासदार राहिल्या आहेत. श्रेयसी यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या घराण्यातून मिळाला आहे. श्रेयसीने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी घेतली आणि त्यानंतर फरिदाबादमधून एमबीएची पदवी घेतली.
अर्जुन पुरस्काराने नामांकित
श्रेयसी सिंह यांनी 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांना 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रेयासी यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना जमुई या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत श्रेयासी यांचा विजय झाला होता.