पिंपरी – तळेगाव दाभाडे शहरात गुरुवारी (दि. 20) चार ठिकाणी हवेत गोळीबाराची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र चार ठिकाणी घडलेल्या गोळीबारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात चार ते पाच जणांचे टोळके हातात पिस्तूल घेऊन फिरत होते. शहरात फिरत असताना टोळक्याने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या टोळक्याने चार ठिकाणी गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही.
10 मे रोजी तळेगाव दाभाडे शहरात गोळीबार झाला होता. चोरी करण्यासाठी रेकी करत असलेल्या एकाला पोलीस उपनिरीक्षकाने हटकले. त्यावरून चोरट्याने थेट गोळीबार करत आपल्या साथीदारासह पळ काढला. ही घटना मस्करनेस कॉलनीमध्ये घडली. हे चोरटे बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी आले होते.