बेल्हे, (वार्ताहर) – अणे (ता. जुन्नर) येथील श्री रंगदास स्वामी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश शिंदे तर उपाध्यक्षपदी चंद्रभागा दाते यांची निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून संतोष भुजबळ यांनी कामकाज पाहिले.
मावळते अध्यक्षांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब दाते यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. दीपक आहेत यांनी संस्थेबद्दल मार्गदर्शन करून संस्थेला नवीन काय करता येईल याविषयी थोडक्यात माहिती दिली.
तसेच शिंदेवाडीचे माजी सरपंच रोहिदास शिंदे यांनी संस्थेचा व सभासदांचा आपल्यावर असणारा विश्वास आबादीत ठेवून संस्थेचे प्रामाणिकपणे कामकाज करावे, असे आवाहन मनोगतात व्यक्त केले. तद्नंतर गंगाराम आहेर यांनी आभार मानले.