Sharad Pawar On Rahul Gandhi । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबाबद्दल अभिनंदन केले. तसेच आपली पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी,”लोकांना याचा फायदा होईल अशी आशा आहे” असे त्यांनी म्हटले.
भारत जोडो यात्रेतून मिळालेला अनुभव उपयोगी पडेल Sharad Pawar On Rahul Gandhi ।
शरद पवार यांनी सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी,”राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवल्याबद्दल अभिनंदन. भारत जोडो यात्रेतून मिळालेला अनुभव उपयोगी पडेल. संविधान आणि लोकांच्या हिताच्या रक्षणाच्या या हृदयस्पर्शी प्रवासासाठी राहुल गांधींना शुभेच्छा.
संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी लोकसभेचे प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांना पत्र पाठवून राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील अशी माहिती दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे? Sharad Pawar On Rahul Gandhi ।
राहुल गांधींना ही जबाबदारी मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली राहुल गांधी त्यांचा आवाज बनत आहेत.
In the 18th Lok Sabha, the House of the People shall truly reflect the aspirations of the last person standing, with Shri @RahulGandhi becoming their voice.
As Congress President, I am confident that a leader who has traversed the length and breadth of the country from…
— Mallikarjun Kharge (@kharge) June 25, 2024
ते म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष म्हणून मला विश्वास आहे की, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत संपूर्ण देशाचा दौरा करणारा नेता लोकांचा, विशेषत: उपेक्षित आणि गरीबांचा आवाज उठवेल. “काँग्रेस पक्ष न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या शाश्वत तत्त्वांचे पालन करत लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
हेही वाचा
मविआच्या 96 : 96 : 96 फॉर्म्युल्याची चर्चा ; मित्रपक्षानं दिला विधानसभेसाठी 12 जागांचा प्रस्ताव