Sharad Pawar On Devendra Fadnavis । Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. लोकसभेच्या 543 जागांवर मतदान होणार आहे.
पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे. तर 4 जूनला निकाल लागणार आहे. । Sharad Pawar On Devendra Fadnavis
महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील होताना दिसत आहे. अश्यातच आता शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्ष फोडीवरून जोरदार घणाघात केला आहे. ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन पक्ष फोडून आल्याचं सांगितलं, ते त्यांचं कर्तृत्व सांगत आहे. । Sharad Pawar On Devendra Fadnavis
पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना पक्षातील हजारो नाहीतर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत’, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी बारामती लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्याला शरद पवार यांची उपस्थिती लावली.
या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले…. । Sharad Pawar On Devendra Fadnavis
मी दोन पक्ष फोडून आलो, असं देवेंद्र फडणवीसांनी एका भाषणात सांगितलं. त्यांचं काय कर्तृत्व आहे, ते सांगत आहेत. पण, फोडलेल्या पक्षांमध्ये हजारो, लाखो कार्यकर्ते आहेत. ते असं बोलणाऱ्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
काही लोकांनी व्यक्तिगत हल्ले सुरू केले आहेत. पण पक्ष फोडणाऱ्यांना लाखो कार्यकर्ते आणि शिवसैनिक योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही महाराष्ट्रमध्ये नेतृत्व करू, असं पवार म्हणाले आहेत.
खऱ्या अर्थानं आपणं माणसं एकत्र जोडण्याचं काम करतो, त्यांच्याबद्दल आदर दाखवतो. पण यांनी पक्ष फोडले. तरी कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत. काही जण दमदाटी करीत आहेत, पण त्यांना माहीत नसेल की, दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही. असं पवार यावेळी म्हणाले.