Lal Krishna Advani | माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९६ वर्ष आहे. त्यांच्या वयाशी संबंधित समस्या लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना एम्समधील जेरियाट्रिक विभागातील डॉक्टराच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
भारतरत्न पुरस्काराने सन्मान Lal Krishna Advani |
दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी पाकिस्तानातील कराची येथे झाला. मात्र 12 सप्टेंबर 1947 रोजी पाकिस्तान सोडल्याचं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. दरम्यान, याच वर्षी लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारा भारतरत्न पुरस्कार प्रदान केला होता.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न देऊन सन्मानित केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उपस्थित होते.
लालकृष्ण अडवाणी यांची कारकीर्द Lal Krishna Advani |
- 2015 मध्ये अडवाणी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.
- 2015 मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आले होते.
- लालकृष्ण अडवाणी हे 2002 ते 2004 पर्यंत भारताचे सातवे उपपंतप्रधान होते.
- ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत.
- अडवाणी हे तीन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
- अयोध्या राम मंदिर आंदोलनात त्यांनी प्रमुख नेत्याची भूमिका बजावली होती.
- लालकृष्ण अडवाणी 1998 ते 2004 या काळात सर्वाधिक काळ गृहमंत्री होते.
- ते लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षाचे नेते आहेत.
हेही वाचा: