हिंजवडी (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पडवळ (समता विद्यालय भोसरी), सचिवपदी सुबोध गलांडे (प्राचार्य, ज्ञानदीप विद्यालय रुपीनगर ,तर कार्याध्यक्ष पदी अशोक जाधव (कीर्ती विद्यालय निगडी) यांची निवड झाली.
संघाचे वार्षिक बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, पिंपरी चिंचवड संघाचे मावळते माजी अध्यक्ष कैलास पवळे ,कल्याण बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवीन शैक्षणिक धोरण ,विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न ,शालेय शिस्त याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची नाविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
खजिनदारपदी शिवाजी गारगोटे, बाबाजी शिंदे, मृदुला महाजन, उपाध्यक्षपदी संतोष काळे, गणेश काळे, अंबादास गर्जे सह सचिव पदी अजय राऊत ,उद्धव ढोले , विद्या सचिव पदी हनुमंत मारकड, नेहा पवार, नाईकरे के.बी, वार्तापत्र संपादक पदी आभोंकर एच बी, हिशोब तपासणीस पदी नयना जगताप, मार्गदर्शक सल्लागार म्हणून महेंद्र गणपुले, हरिचंद्र गायकवाड, कैलास पवळे, महिला प्रतिनिधी म्हणून विद्याराणी वाल्हेकर ,अर्चना माने, यांची निवड करण्यात आली आहे.