राहाता, (प्रतिनिधी)- लोकनेते पद्यभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत तसेच बँकेत निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी यांनी दिली.
यामध्ये पायल म्हसे, राहुल झाडे व वैभव निसरद यांची कृषी सहाय्यक तसेच उदय निंबाळकर यांची आयडीबीआय बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदावर निवड झालेली आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी कृषी महाविद्यालय, लोणी विविध उपक्रम राबवत असते.
त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवार फेरी, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी, कार्यानुभव उपक्रम, शेतकरी मेळावे आदी उपक्रमांचा समावेश होतो