नवी दिल्ली – रॉयल सौदी नौदलाच्या किंग फहाद नौदल अकादमीचे ७६ प्रशिक्षणार्थी २४ जून रोजी कोची इथल्या दक्षिण नौदल कमांड येथे भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॅड्रनमध्ये सहभागी झाले.
असे प्रशिक्षण घेणारी प्रशिक्षणार्थींची ही दुसरी तुकडी आहे. पहिल्या तुकडीचे असेच प्रशिक्षण मे- जून २०२३ मध्ये झाले होते. रॉयल सौदी नौदलाच्या प्रशिक्षणार्थींचे कार्यशिबिर भारतीय नौदलाच्या १०७ अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रमासोबत आयोजित केले जाते.
दोन्ही देशांच्या प्रशिक्षणार्थींमध्ये सौहार्द आणि परस्पर सामंजस्य वृद्धिंगत करणे, हा यामागचा हेतू आहे. रॉयल सौदी नौदलाचे प्रमुख ऍडमिरल फहाद अब्दुल्ला एस एल घोफैली यांनी जानेवारी २०२४ मध्ये भारताच्या अधिकृत भेटीदरम्यान दक्षिण नौदल कमांडला भेट दिली होती.