भोर, (प्रतिनिधी) – आपटी,निगुडघर (ता.भोर) येथे बौध्दजन संघ, भोर यांच्या वतीने महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह ‘क्रांती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपटी येथील दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांच्या स्तंभाला मानवंदना देण्यात आली. निगुडघर येथे बुद्धवंदना, जाहीर सभा, मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून महाड चवदार तळे या ठिकाणी जाणाऱ्या भिम अनुयायांना भोजन दान, पाणपोई व सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. आंबेडकरवादी युवा संघटनेच्या वतीने भोर स्टॅण्ड ते निगुडघर टु व्हिलर रॅली काढण्यात आली.
या कार्यक्रमाला दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कश्यप साळुंखे, बौध्दजन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सपकाळ, अविनाश गायकवाड, सरपंच मंगल कंक, उपसरपंच अविनाश गायकवाड, अनिल गायकवाड, सुनील मोरे, सतिश गायकवाड, सचिन गायकवाड, अंकुश गायकवाड, पांडुरंग गायकवाड, प्रकाश गायकवाड, मिलिंद साळुंके, विजय गायकवाड, अंकुश साळुंके,
बबन गायकवाड, विश्वनाथ सातपुते, दीपक गायकवाड, संतोष जाधव, जगन्नाथ पारठे, शंकर पारठे, हनुमंत पारठे, रवी कांबळे, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, नितीन माने, रणजीत रणखांबे, आकाश गायकवाड, मिलिंद जगताप उपस्थित होते. अनिल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. विजय ओव्हाळ व आनंदा सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. तर, अविनाश गायकवाड यांनी आभार मानले.