– राजेंद्र वाघमारे (प्रतिनिधी)
नेवासा – श्री ज्ञानेश्वरीचे रचणास्थान तीर्थक्षेत्र नेवासा येथील विकास आराखड्याचा विस्तारित अर्थसंकल्पात समावेश झाल्याने नेवासकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जगाला ललांभूत ठरणाऱ्या जन्मस्थान असलेल्या श्री ज्ञानेश्वरीचे तीर्थस्थान नेवासा हे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. अनेक सरकारे आली व गेली प्रत्येक वेळी या अर्थसंकल्पात तरतूद होईल अशी नेवासकरांना अपेक्षा होती परंतु दरवेळी अपेक्षाभंग झालेला दिसून आला.
राज्याचे महसूलमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४०० कोटींचा विकास आराखडा सरकारला सादर केल्याची माहिती त्यांनी नेवासकारांना दिलेली होती व पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहाता येथील सभेत तीर्थक्षेत्र विकासाला पैसे कमी पडू दिले जाणार नाही अशी घोषणा केलेली होती व त्याचा पुनरुच्चार नुकताच लोणी येथे केला होता.
नुकतीच नेवासा ग्रामस्थानी लोणी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पावसाळी अधिवेशनात होणाऱ्या अर्थसंकल्पात विकास आराखाड्यासाठी तरतूद व्हावी अशी विनंती केली होती.
दि.२८ जून रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला, त्यात नेवासा येथील ज्ञानेश्वरी रचणास्थान तीर्थक्षेत्र विकास आराखडा घेतला असल्याचे सभागृहात जाहीर केले.
त्यामुळे भविष्यात लवकरात लवकर निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी विखे पाटील यांच्या सहकार्याने पाठपुरावा होणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आंनदाचे वातारण निर्माण झाले असून नेवासा शहरातील जेष्ठ विधिज्ञ अॅड.के.एच.वाखुरे यांनी राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि पालकमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे.