Samruddhi Highway Accident । समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येतीय. जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येतंय. तसेच, 4 जण गंभीर जखमी झालेत. तर, चारजण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या कारला राँग साईडनं येणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.
जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. एका जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी अकराच्या सुमारास नागपूरवरून मुंबईकडे जाणारी आर्टिका आणि राँग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायरची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला.
क्रेनच्या सहाय्यानं कारला उचललं Samruddhi Highway Accident ।
अपघाताची माहिती कळताच पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत जखमींना ॲम्बुलन्समधून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं. दरम्यान, यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या आर्टिका गाडीला क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आला. अपघातातील चारपैकी तिघांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना करण्यात आले आहे.
नेमका कसा झाला अपघात? Samruddhi Highway Accident ।
समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन गाड्यांची जोरदार टक्कर झाली. या अपघातात आर्टिका गाडी जी नागपूरवरून मुंबईला जात होती. या गाडीची राँग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीवर जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या 4 ते 5 फूट खाली कोसळली. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.
अपघातातील मृत व्यक्तींची नावं
फय्याज शकील मंसुरी ,फैजल शकील मंसुरी, अल्थमेश मंसुरी (सर्व रा. मालाड मुंबई पूर्व, आर्टिका कार क्र. MH 47 RP 5478 मधील) ,प्रदिप लक्ष्मण मिसाळ वय 38 वर्ष रा. पिंपळनांव ता. दे. राजा., संदीप माणीकराव बुधवंत वय 30 वर्ष (कार चालक), विलास सुदान कायंदे वद 28 वर्ष रा. उरकीड ता. दे.राजा (स्वीफट कार का. MH 12 MF 1856 मधील इलम अशी मृतांची नाव आहेत.