टेलिव्हिजन अभिनेत्री रिद्धिमा पंडितबद्दल बातम्या आल्या होत्या की, ती क्रिकेटर शुभमन गिलसोबत लग्न करत आहे. अखेर अभिनेत्रीने आपण शुभमन गिलसोबत लग्नाच्या चर्चांवर सोशल मीडियावर कंमेंस्ट करत उत्तर दिल आहे.
अभिनेत्री रिद्धिमा पंडित डिसेंबर 2024 मध्ये गिलसोबत लग्न करणार असल्याचा दावा करणाराअसल्याची बातमी व्हायरल झाली. मात्र, आता या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे रिधिमाने स्पष्ट केले आहे.
रिपोर्टनुसार, रिद्धिमा पंडितने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ टाकला, ज्यामध्ये ती म्हणाली, ‘माझ्या लग्नाबद्दल विचारणा करणाऱ्या पत्रकारांच्या अनेक कॉल्सने मला जाग येते मला लग्नाबाबत विचारल्या जाते माझ्या आयुष्यात असे काही घडले तर मी स्वतः पुढे येऊन ही बातमी जाहीर करेन, या बातमीत तथ्य नाही.
रिधिमा पंडित ‘बहू हमारी रजनीकांत’ आणि ‘खतरा खतरा’ सारख्या टेलिव्हिजन शोसाठी ओळखली जाते. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनमध्येही ती दिसली होती. शुभमन गिलने लग्नाच्या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी अफवा पसरल्या होत्या की तो क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत आहे.