पिंपळे गुरव, (वार्ताहर ) – रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून नवी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात रक्तदाते, रक्तदान शिबिर आयोजक, रांगोळी व पोस्टर स्पर्धा विजेते यांचा सत्कार करण्यात आला.
मेट्रो रक्तकेंद्र, औंध जिल्हा सामान्य रुग्णालय, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, उरो रुग्णालय वैद्यकीय अधीक डॉ. होसमानी, मेट्रन मॅडम, प्रशासकीय अधिकारी शृंगारे, रुण कल्याण समितीचे सदस्य डॉ. देविदास शेलार, शरीरविकृती विभाग प्रमुख डॉ. भगवान मेथे, स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता कोरे, रक्तपेढी विभागप्रमुख डॉ. निशा तेली, डॉ. सुरेश पारधे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमात अनेकदा रक्तदान केलेले अजयकुमार कांबळे, शैलेश लोहार यांसारखे रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजक राजाभाऊ शिंदे- आझाद मित्र मंडळ, काळेवाडी, मीरा आरेकर, ओबेद अली संन्याय यांचा देऊन सत्कार केला. रांगोळी व पोस्टर स्पर्धांचे विजेते यांचादेखील यावेळी बक्षीस देऊन सत्कार केला.