Rahul Gandhi in Lok Sabha First Session। 18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राची सुरुवात आज गदारोळाने झाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच इंडिया आघाडीचे खासदार हातात संविधानाची प्रत घेऊन निषेध करण्यासाठी बाहेर पडले. विरोधी पक्षाच्या खासदारांनीही पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या निषेधाबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जी संविधानावर जे करत आहेत ते आम्हाला मान्य नाही. त्यांना जे हवे आहे ते आम्ही होऊ देणार नाही, म्हणूनच आज शपथ घेताना संविधानाची प्रत हातात घेतली.” असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले.
‘कोणतीही शक्ती राज्यघटनेला हात लावू शकत नाही’
राहुल गांधी इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेला कोणतीही शक्ती हात लावू शकत नाही. यामध्ये आम्ही कोणताही बदल करू देणार नाही.असे त्यांनी म्हटले. तसेच राहुल गांधींशिवाय काँग्रेसच्या सर्व खासदारांनी भाजप सरकारचा विरोध केला.
खरगेंचीही मोदींवर सडकून टीका Rahul Gandhi in Lok Sabha First Session।
आंदोलनाबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, “नरेंद्र मोदीजींनी संविधान तोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच आज सर्व पक्षांचे नेते एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. जिथे गांधींचा पुतळा होता, तो हटवण्यात आला होता. बाबा आंबेडकरांचा पुतळाही हटवण्यात आला होता. काढून टाकले, ते सर्व लोकशाहीचे नियम मोडत आहेत, म्हणून आज आम्हाला दाखवायचे आहे की मोदीजी, तुम्ही संविधानानुसार पुढे जा.” असे ते म्हणाले.
प्रोटेम स्पीकरच्या नियुक्तीवर टीएमसीचा आक्षेप Rahul Gandhi in Lok Sabha First Session।
टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनीही प्रोटेम स्पीकरच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले असल्याने आम्ही निषेध करत आहोत. ज्या प्रकारे प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करण्यात आली आहे, ते घटनात्मक तरतुदींचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि उदाहरणांचेही स्पष्ट उल्लंघन आहे.”
हेही वाचा
“देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक…”; संसदेच्या अधिवेशनापूर्वी नेमकं काय म्हणाले PM मोदी?