‘पेनकिली’ हा चित्रपट फहद फासिलच्या प्रोडक्शन हाऊस ‘फहद फासिल अँड फ्रेंड्स’च्या बॅनरखाली बनवला जात आहे. काही काळापूर्वी निर्मात्यांनी अंगमली तालुकच्या सरकारी रुग्णालयात या चित्रपटाचे शूटिंग केले. रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये जेव्हा डॉक्टर रुग्णांवर उपचार करत होते तेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण झाल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी कलाकारांसह 50 लोक उपस्थित होते.
शूटिंगसाठी तिथे काही गोष्टींवर बंदी घालण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. वॉर्डातील दिवेही मंद झाल्याने रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागले. आता ही बाब चित्रपट निर्मात्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. या प्रकरणाची दखल घेत आयोगाने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून सात दिवसांत जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालय व्यवस्थापकांकडून उत्तर मागितले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सर्व नियम पाळण्यात आल्याचे चित्रपट निर्मात्यांचे म्हणणे असून रुग्णांना त्रास होण्याची शक्यता नाकारली जात असल्याचेही बोलले जात आहे.
मात्र, २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातून त्याला बरीच ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी आयपीएस भंवर सिंह शेखावत यांची भूमिका साकारली होती. आता या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भागही येणार असून त्यात फहादही दिसणार आहे.