पुणे – तातडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी वारजे नवीन आणि जुने जलकेंद्र वगळता शहरातील इतर सर्व जलकेंद्र गुरूवारी ( दि.४ जुलै) रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोथरूड, पाषण, बावधनचा काही भाग, बाणेर आणि बालेवाडी वगळता शहराच्या सर्व भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
गुरूवारी खडकवासला जॅकवेल (नवीन), नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतु:शृंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर व भामा आसखेड या जलकेंद्रांचा समावेश आहे.
या भागात राहणार पाणी बंद
पर्वती जलकेंद्र – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क.
गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२, ४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर,
लष्कर जलकेंद्र : संपूर्ण हडपसर परिसर, कोरेगाव पार्क, वानवडी, हांडेवाडी रोड, कोंढवा खुर्द, कोंढवा, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर.
एस.एन.डी.टी.जलकेंद्र – गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, चतु:शृंगी टाकीवरुन पाणीपुरवठा होणारा बाणित भाग, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर.
वडगाव जलकेंद्र :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी.