पुणे – फर्गसन रस्त्यावरील एल थ्री बारमधील पार्टीत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आणखी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. अमली पदार्थांचा पुरवठा प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक केली होती.
अक्षय स्वामी, आर्यन पाटील अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी पोलिसांनी अभिषेक सोनवणे, ओंकार सकट, तसेच नायजेेरियन नागरिक इडोको संडे यांना अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी बारमध्ये कारवाई केल्यानंतर शहरातील पब आणि बारमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले. बारमध्ये मेफेड्रोनचे सेवन करणारे नितीन ठोंबरे (३४, रा. गोरेगाव, मुंबई) आाणि करण मिश्रा (३४, रा. मुंढवा) यांना अटक करण्यात आली.
चौकशीत अभिषेक सोनवणेने त्यांना मेफेड्रोन विकल्याचे तपासात उघडकीस आले. साेनवणे, त्याचे साथीदार ओंकार सकट, इडोको संडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपी अक्षय स्वामी, आर्यन पाटील तरुणांना मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे उघडकीस आली. त्यानतंर पोलिसांनी स्वामी आणि पाटील यांना अटक केली. स्वामी आणि पाटील किरकाेळ स्वरुपात मेफेड्रोनची विक्री करत होते. त्यासाठी ते मोबाइलचा वापर करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.