मार्केट यार्ड – मार्केट यार्ड येथील गुळभूसार विभागातील सुमारे ३९ सभासदांच्या दुकानात वारकरी मंडळींचा मुक्काम करण्यात आला. सभासदांच्या दुकानात भाविक वारकरी यांची चहापाणी, अल्पोपहार, भोजन, स्वच्छतागृहे व रहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुकानांचे मालक, दिवाणजी व कर्मचारी यांनी वारकरी यांचे मोठ्या भक्ती भावाने व मनोभावे स्वागत केले.
गुळ व भुसार विभागातील संपूर्ण स्वच्छता, औषध फवारणी, पावडर फवारणी, दोन दिवसांत पुरेसे पाणी पुरवठा, वीजेची व्यवस्था, कचऱ्यासाठी ठिकठिकाणी कंटेनरचीतसेच स्वच्छतागृहे व चोख सुरक्षा व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच येथील सर्व घटकांतर्फे करण्यात आली होती.
वारकऱ्यांना रेनकोट, खाद्यान्न वस्तू, पाण्याच्या बाटल्या, कपडे, आर्थिक मदत करण्यात आली. मार्केट यार्ड गुळ भूसार विभागात दोन दिवस आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले. मार्केट यार्डमधील व्यापार्यांचे एक अतुट नातं वारकऱ्यांबरोबर निर्माण झाले आहे.
यंदा प्रथमच दी पूना मर्चंटस् चेंबरतर्फे मार्केट यार्ड मधील जे अनेक वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत, अशा व्यापाऱ्यांच्या दुकानी कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन वारकरी सेवा रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले, अशी माहिती दी पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.