विश्रांतवाडी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर कळस, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, टिंगरेनगर, शांतीनगर, येरवडा परिसरातील भाविकांनी उत्साहात स्वागत केले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी पालखीचे स्वागत करण्यासाठी कक्ष उभारले होते. त्यांनी खाद्यपदार्थ, पाणी, छत्र्या, औषधे वाटप करून वारकऱ्यांची सेवा केली.
धानोरीतील माता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना छत्र्या, राजगिरा लाडू, पाणी बॉटल, बिस्किटे वाटप करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अनिल टिंगरे,.युवा नेते विशाल टिंगरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश रणनवरे,सुभाष पाटील, साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश देशपांडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे व सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे विश्रांतवाडी चौकात भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस व विजय मंगल प्रतिष्ठानच्यावतीने आमदार सुनील टिंगरे, युवा नेते सुहास टिंगरे, शितल टिंगरे, रवी टिंगरे यांनी विविध वस्तूंचे वाटप करुन वारकऱ्यांची सेवा केली.
माजी आमदार जगदीश मुळीक, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यासह वडगाव शेरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वारकऱ्यांना खाऊ वाटप करून सेवा करण्यात आली. लोक विकास संघटना व युवा सोशल फाउंडेशनच्यावतीने माऊली भक्तांना शुध्द पिण्याचे पाणी व बिस्किटे वाटप करण्यात आले. अध्यक्ष अभिजीत उकारडे, बाळकृष्ण नागरी पत संस्थेचे चेअरमन कुणाल टिंगरे, आमदार सुनील टिंगरे, माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, युवा नेते सुरेंद्र पठारे, मोनीका मुरलीधर मोहोळ व संघटनेचे पदाधिकारी राहुल भोसले, ओंकार शिंगटे, गोविंद म्हस्के, किसन जगताप, प्रवीण जगताप, तुषार मोहिते, शुभम मातंग, राजकुमार तंतरपाळे आदी उपस्थित होते.
कळस याठिकाणी वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सतीश म्हस्के, मिनाक्षी म्हस्के यांनी फराळाचे साहित्य वाटप केले. तसेच विविध औषधे वाटप केले. काँग्रेस पक्षाच्या वतीने वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष राजू ठोंबरे, विशाल धापटे यांच्या वतीने वारकऱ्यांना विविध खाद्यपदार्थांचे वाटप केले. धानोरी येथील कमल प्रतिष्ठानतर्फे माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांनी वारकऱ्यांनी खाऊ वाटप करण्यात आले.
मनसेच्या वतीने माजी नगरसेविका सुनिता साळुंखे, अनिल साळुंखे, करण साळुंखे यांच्या वतीने वारकऱ्यांना राजगिरा लाडू व पाण्याचे वाटप केले. शशी अण्णा टिंगरे सोशल फाउंडेशन व जाणता राजा प्रतिष्ठाणतर्फे वारकऱ्यांना दहा हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. दलित क्रांती रिक्षा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विशाल साळवे यांच्या वतीने वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
विनोद पवार मित्र परिवाराच्यावतीने राजगिरा लाडू व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. येरवडा डॉक्टर असोसिएशन व चंद्रकांत जंजिरे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वारकऱ्यांना मोफत औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी येरवडा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गभाले डॉ. अंबाजी शेंडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत जंजिरे, शामा जाधव यासह मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक सागर माळकर, संजय भोसले, आनंद गोयल, आबा खलसे यांनी विविध ठिकाणी वारकऱ्यांना साहित्यांचे वाटप करुन सेवा केली.एकता प्रतिष्ठाणचे मंगेश परदेशी, दान प्रतिष्ठानचे दशरथ माटवनकर, भीम लहुजी महासंग्राम संघटनेच्यावतीने विनोद वैरागर यांनी देखील विविध वस्तूंचे वाटप करून वारकऱ्यांची सेवा केली.
विश्रांतवाडी ट्रक चालक,मालक संघटनेतर्फे पोपटराव सुर्यवंशी यांच्यावतीने गुडदानीचे वाटप करण्यात आले. संदीप दांगट, सुरेखा दांगट, सोमनाथ टिंगरे, विठ्ठल कोथेरे यांच्यावतीने देखील खाद्यपदार्थ वाटून सेवा करण्यात आली. अष्टविनायक मित्र मंडळातर्फे सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव, अभिजित कदम, गौरव देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांच्या चप्पल, बूट,बॅग, छत्री दुरुस्ती तसेच हातापायाची मसाज व दाढी कटिंग सेवा करण्यात आली. शिवयोगी प्रतिष्ठानचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र बिडवे यांनी विविध प्रकारची औषधे वाटप केले.