वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथे फडई चौकातील, अमोल सातव यांचे इमारतीच्या टेरेसवरील खोलीमध्ये 13 पानी जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, मसपोनि विजया वंजारी व तपास पथकातील अंमलदार पो. ह. संदीप तिकोने, सागर जगताप, अजित फरांदे, स्वप्नील जाधव, अमोल ढोणे,
आशिष लोहार यांनी छापा टाकुन सदर ठिकाणी 01 जुगार चालक इसम व इतर 04 खेळाडू इसम हे 13 पानी जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांचे कडून रोख रक्कम, चार चाकी वाहन व जुगार खेळण्याचे साहित्य असे एकूण 4,43,810/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ), 4 प्रमाणे कारवाई करण्यात केली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी अवैध धंदे चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांवर वचक निर्माण करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाली आहे.