पुणे : लष्कर न्यायालच्या स्थलांतराचा मुहुर्त ठरला आहे. येत्या गुरूवारी (दि. २७) वानवडीत पुणे महानगरपालिकेने निर्माण केलेल्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनात हे न्यायालयात स्थलांतरित झाले आहे.
अपुरी जागा आणि बांधकाम जीर्ण झाल्याने लष्कर न्यायालय तात्पुरते स्थलांतरित करण्यात येत आहे. या दिवशी सकाळी १० वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हे स्थलांतर होणार आहे.
ब्रिटीश काळापासून तेथे न्यायालय सुरू आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या न्यायालयासाठी स्वतंत्र जागा देण्याची मागणी होत आहे. मात्र नवीन जागा न मिळाल्याने आणि येथे कामकाज करणे शक्य नसल्याने न्यायालयात तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे हलविण्यात आले आहे.
पुणे जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत कॅम्पमध्ये अनेक वर्ष लष्कर न्यायालय कार्यान्वित आहे. या न्यायालयात हडपसर, लष्कर, वानवडी, कोंढवा आणि व मुंढवा पोलिस ठाण्याचे कामकाज चालते. या न्यायालयात सध्या सुमारे ३० हजार हून अधिक खटले प्रलंबित आहेत