Pune Drugs Case| शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एफसी रोडवरील एका हॉटेलमधील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे.
या घटनेने आता पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर याप्रकरणी टीका केली. यावर राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे? Pune Drugs Case|
“पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत. जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. तसेच उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. असे केल्याशिवाय पुणे सुधारणार नाही,” अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली.
शंभुराज देसाई यांचे प्रत्युत्तर Pune Drugs Case|
“हा व्हिडिओ आताच पहिला असून याची चौकशी आम्ही करू. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या महिन्याभरात आपण पुण्यात ४९ हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. तसेच पुण्यात सरप्राईज चेकिंग सुरु करण्यात आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत. कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचे साटेलोटे नसून जो अधिकारी यात दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल,”असे आश्वासन शंभुराज देसाई यांनी दिले.
तर याप्रकरणावरून आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील शंभुराजे देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यात पोलिसांची चूक आहे. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. पैसे घेतल्यामुळे असे धंदे चालतात. राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहचात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा मोठा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.
हेही वाचा