जांबूत – बेटभागातील प्राथमिक शाळा व विद्यालयात आतंरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.यावेळी मुलांनी विविध प्रात्यक्षिके उत्साहात सादर केली.
यावेळी पिंपरखेड, जांबूत, काठापूर, चांडोह, फाकटे, वडनेर या बेटभागातील जिल्हा परिषद शाळा व विद्यालयात योग विद्येचा प्रचार व विकास होण्यासाठी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी योग प्रात्यक्षिक मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगदिनानिमित्त योग प्रशिक्षित शिक्षकांनी शालेय मुलांना विविध योगसाधनेच्या माध्यमातून शरीर संपदेचे रक्षण या विषयीची माहिती व योगासन प्रात्यक्षिक करून योगासनाचे महत्त्व सांगितले.