यवत – नाथाचीवाडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व शिक्षकांकडून विशद करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शरदचंद्र नातू, सारिका कुंजीर, सुवर्णा शेलार, सुजित खेडेकर, पिंपळगावचे केंद्रप्रमुख सुरेश कटके आदींनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेतला.
यावेळी मुलांना पोषण आहारामध्ये दुधाचे वाटप देखील करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.