बिरोबावाडी (ता.दौंड) : येथील पाटस -दौंड अष्टविनायक महामार्गावर दुसरीत शिकणाऱ्या लहान बालकाला चार चाकी पिकअपने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. याठिकाणी संतप्त नागरिकांनी रस्ता बंद केला आहे. रस्त्यावर वाहतुकीच्या लांब रांगा लागल्या आहेत .
अपघातात जागीच मयत झालेल्या आयुश राजेश यादव (८) असे या शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना बिरोबावाडी येथील अष्टविकानाय रस्त्यावरील मुख्य चौकात घडली आहे. याचं चौकात जिल्हापरिषद शाळा आहे. त्याची आई आपल्या मुलीला व मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना पाटसवरून दौंड दिशेने वेगात जाणाऱ्या पिकअपने रस्ता क्रॉस करत आता विद्यार्थ्याला जोराची धडक दिली. या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाळेच्या चौकात अष्टविनायक महामार्गावर गतिरोध करण्याची मागणी यावेळी संतप्त झाले नागरिक करत आहे यामुळे त्यांनी दौंड पाटस अष्टविकानाय रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना शांत करण्यासाठी यवत पाटस पोलिस पर्यंत करीत आहे.