प्राचार्य रामदास थिटे : जातेगाव विद्यालयात योगाचे धडे
पाबळ – “आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना यावर्षीची थीम ‘ स्व : आणि समाजासाठी योगा ‘ अशी आहे. जीवनात शांतता, सामर्थ्य आणि स्थैर्य याद्वारे स्वतःच्या क्षमतांचीची जाणीव होते. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत जीवनातील उत्साह वाढविण्याकामी शालेय वयापासूनच दैनंदिन योगा करणे हाच संकल्प करा, असे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले.
जातेगांव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने विविध प्रात्यक्षिके, आसने, सूर्यनमस्कार, यांचे आयोजन करणेत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व शिक्षकवृंदांनी व विद्यार्थ्यांनी मान, खांदा, कंबर व पायांच्या हालचाली, दंड स्थितीतील ताडासन, वृक्षासन, अर्ध वक्रासन, बैठक स्थितीतील दंडासन, वज्रासन, वक्रासन आदी व्यायाम प्रकार याप्रसंगी उत्साही वातावरणात पार पाडले.
विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक कांतीलाल धुमाळ, प्रमोद काळे यांनी योगाविषयी विविध माहिती दिली. या उपक्रमास संस्था अध्यक्ष सुगंध उमाप, सचिव प्रकाश पवार व मार्गदर्शक कांतीलाल उमाप यांनी शुभेच्छा दिल्या.
योगसाधना योग्य प्रयत्नाने व सातत्याने सिद्ध होते, त्यासाठी तासाभराचा वेळ खर्ची पडतो. योगसाधनेचे अनेक फायदे होतात हे जितके खरे आहे, तितके अनुभवाने दुप्पट जाणवते. दुपारी बारा वाजता सुद्धा सकाळचे सात वाजले आहे असा उत्साह जाणवतो, हा स्वानुभव प्राचार्य थिटे यांनी आवर्जून सांगितले