तळेगाव ढमढेरे- निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिराच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत, विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळूंगी व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने करण्यात आले.
विद्या विकास मंदिर हायस्कूल आणि जिल्हा परिषद शाळा निमगाव म्हाळुंगी या सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता. आर्ट ऑफ लिव्हिंगचे मुख्य प्रक्षिक्षक तुकाराम जावळे, निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी माहिती सांगितली.
याप्रसंगी निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, विद्या विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक संजीव मांढरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे, मारुती निकम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विराज भंडलकर, आशा वर्कर सुजाता चव्हाण, कामिनी नागवडे, तसेच सर्व शाळेचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. विद्या विकास शाळेचे मुख्याध्यापक संजीव मांढरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मुकुंद ढोकले यांनी केले.