घोडेगाव येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्र्याच्या उदासिनीतेचा परिणाम
मंचर – एक कोटी सत्तर लाख रुपये निधी आंबेगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल आणि मे महिन्यासाठी उपलब्ध झाला. परंतु घोडेगाव येथील तहसील कार्यालयात असलेल्या संजय गांधी योजनेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासिनीतेमुळे ७ हजार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आंबेगाव तालुका तहसील कार्यालय घोडेगाव येथील संजय गांधी विभागातील महसूल सहाय्यक यांच्या घोडचुकीमुळे आंबेगाव तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही, असे समर्थ दिव्यांग सेवा संस्था आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष समीर टावरे सागितले. त्यांनी जिल्हा अधिकाऱ्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद करून म्हटले आहे की, आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्याशी संजय गांधी, श्रावण बाळ आणि इंदिरा गांधी योजनेची पेन्शन अद्याप लाभार्थ्याच्या खात्यात जमा झालेले नाही. याविषयी दिव्यांग बांधवांनी विचारणा केली, असता अनुदान प्राप्त झाले आहे.
दोन दिवसात वर्ग होतील. अशी उडवा उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप दिव्याग बांधव सुनील दरेकर आणि ज्ञानेश्वर शिंदे यांनी केला आहे. महसूल सहाय्यक हे वेळोवेळी संबंधित लाभार्थ्यांच्या संजय गांधी योजनेच्या फॉर्मची कागदपत्रे तसेच संजय गांधी अनुदान याद्या तयार करत असताना त्यामध्ये वारंवार चुका करतात, याविषयी संबंधित विभागाला याविषयी माहिती आहे. तरी त्याला पाठीशी घालण्याचे काम ते करत आहेत. संबंधित अधिकाऱ्याची ताबडतोब बदली करावी. त्याच्या त्रास विनाकारण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना इत्यादी योजनेतील लाभार्थ्यांना होत आहे.
घोडेगाव तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेला संजय गांधी विभाग दिव्यांग बांधवांसाठी तळमजल्यावर घेण्यासंदर्भामध्येही तहसीलदार यांच्याशी भेटून पत्र व्यवहार केला गेला असतानाही गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून हा विभाग तळ मजल्यावर आलेला नाही. संबंधित कामचुकार महसूल सहाय्यक यांच्यावर कारवाई करावी, तसेच संजय गांधी विभाग तळमजल्यावर न घेतल्यास तहसील कार्यालय घोडेगाव येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
– सुनील दरेकर आणि ज्ञानेश्वर शिंदे, दिव्यांग बांधव, आंबेगाव तालुका.
महसूल सहाय्यकच्या चुकीमुळे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहे. याबाबत संबंधिताला तहसीलदार संजय नागटिळक आणि मी समज दिलेली आहे. तसेच त्याचा या महिन्याचा पगार थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जो त्रास झाला. त्याबद्दल आम्ही दिलगीर असून यापुढे अशा पद्धतीने कोणालाही त्रास होणार नाही. याची काळजी घेऊ.
– दामूराजे असवले, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, घोडेगाव.