नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भासोबत मिळून आईवर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधानांचे सांत्वन केले आहे. त्यासाठी पवारांनी एक ट्विट केले आहे.
Narendra Bhai , I am deeply saddened to know about passing away of your mother. It’s an irreparable loss of a irreplaceable person in life ! Please accept my sincere condolences on her loss. May her soul rest in eternal peace.@narendramodi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 30, 2022
शरद पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये पहिल्यांदाच मोदींचा उल्लेख नरेंद्रभाई असा केला आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी मोदींचे सांत्वनही केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये पवार यांनी, नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरून न येणारं हे नुकसान आहे! त्याबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.” असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झालं आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी मिळताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.