चिंबळी, (वार्ताहर) – मोई (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी काळुराम तुकाराम फलके यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे संस्थेचे सचिव निलेश श्रीराम देशमुख यांनी सांगितले.
मोई संस्थेच्या सर्व संचालक मडाळांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून भगवान साकोरे यांनी ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बघाटे यांच्या अध्यक्षतेखालील घेण्यात आलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी काळुराम फलके यांचा सर्वानुते एकच अर्ज दाखल करण्यात आला असल्याने त्यांची अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे बघाटे यांनी घोषित केले.
यावेळी उपाध्यक्षा सुरेखा करपे, संचालक संभाजी करपे, समीर गवारी, ज्ञानेश्वर गवारी, जीवन येळवंडे, सभांजी गवारी, जालिंदर गवारी, आनंद गवारी, भगवान साकोरे, मनिषा गवारी, रवींद्र गवारी, चेतन गवारी यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच किरण गवारे, गोरख गवारे, राहुल गवारे, देवीदास मेदनकर, मारूती येळवंडे, मोहन गवारे, गोरख फलके व सर्व संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व संचालक मंडळ यांना विश्वात घेऊन बळीराजास जास्तीत जास्त पीक कर्ज व शेती औजारे तसेच बी बियाणे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष काळुराम फलके यांनी निवडीनंतर सांगितले.