राजगुरुनगर, (प्रतिनिधी)- वाळद (ता. खेड) येथे फोर्टीन ट्री फाउंडेशन व ग्रामपंचायत वाळद यांच्या माध्यमातून गावात 1 हजार विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.
सरपंच मनोहर पोखरकर यांच्या पुढाकाराने वाळद येथे शाळा आणि गावठाण परिसरात झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले होते.
फोर्टीन ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून एक हजार झाडे लावण्यात आली. यावेळी फोर्टीन ट्रीचे अधिकारी आणि झाडांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गावठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, सरपंच मनोहर पोखरकर, मुख्याध्यापक नीलकंठ कोरडे, शालेय समितीच्या अध्यक्ष सुवर्णा हुंडारे, लक्ष्मण पोखरकर,
रामदास पोखरकर, मनोहर कोरडे, देविदास पोखरकर, दादाभाऊ वाळूज, जालिंदर पोखरकर, अशोक पोखरकर, गणेश पोखरकर, राम ओव्हाळ, राम शिंदे, बबन पोखरकर, विलास पोखरकर, गुलाब पोखरकर, बाळासाहेब सावंत,
प्रकाश पोखरकर, राजू पोखरकर, रहेमान इनामदार, प्रमोद ओव्हाळ, मिलिंद ओव्हाळ, बाळू भवारी, नितीन वाळुंज. दीपक पोखरकर, संतोष पोखरकर, धनिका पोखरकर, मनीषा सावंत, राजू वाळुंज, संदीप भालेराव. एकनाथ पोखरकर, मारुती पोखरकर, दादाभाऊ पोखरकर, विलास पोखरकर यांच्यासह ग्रामस्थ शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.