पिंपरी – भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीस्वार 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 15 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रोशन गार्डन समोर, भोसरी येथे घडली.
मुरलीधर पांडुरंग लांडे (वय 70, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल मुरलीधर लांडे (वय 33) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच 14 एचयु 3751) वरील चालक जगदीश कुमार चेतराम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या डुडुळगाव येथे भाड्याने खोल्या दिल्या आहेत. त्याचे भाडे घेण्यासाठी फिर्यादी यांचे वडील मुरलीधर लांडे हे सोमवारी सकाळी दुचाकीवरून गेले होते. भाडे घेऊन परत घरी येत असताना रोशन गार्डन जवळ त्यांच्या दुचाकीला आरोपी चालवत असलेल्या कंटेनरने धडक दिली. त्यामध्ये मुरलीधर लांडे यांचा मृत्यू झाला.