मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने निवडणुकीसाठी उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास टाकून त्यांना विधानपरिषदेचे तिकीट दिले आहे. तसेच सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांनादेखील भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मविआचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. यानंतर आता भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्यात येण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 12 जुलैनंतर होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकिट दिलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्याआधी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली होती. आता त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार आहे.