देहूगाव, (वार्ताहर) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त तीर्थक्षेत्र देहूमध्ये राज्याच्या कानाकोपऱयातून दिंड्या आणि वारकरी दाखल झाले असून देहू मुख्य मंदिरामध्ये पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देहूचा परिसर भक्तीमय बनला आहे. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार आहे. वारकरी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दर्शनबारीमध्ये थांबून दर्शन घेत आहेत.
त्यातच देहू मुख्य मंदिरामध्ये पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. खांद्यावर पताका, डोक्यावरील तुळशी वृंदावन आणि टाळ, मृदुंग, वीणा यांच्या गजराने परिसर भक्तीमय झाला आहे.